विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी.परंडा
परंडा:दिनांक 12 आक्टोंबर रोजी सिना-कोळेगाव प्रकल्प पाणीसाठा अंतिम टप्प्यात असून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आले आहे. परंडा तालुक्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याने याबाबत खासापुरी.चांदणी.पांढरेवाडी हे मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तुडुंब भरलेल्या खंडेश्वरवाडी प्रकल्प भरावाला तडा गेल्याने धोका टाळण्यासाठी सांडवा फोडुन पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.तर साकत मध्यम प्रकल्पात अध्यापही मुबलक पाणीसाठा नाही. तसेच आनाळा साठवण तलाव ही पाण्यासाठी व्याकुळ आहे.सिनाकोळेगाव धरणाचे पाणी उपसा सिंचनद्वारे सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहे परतीचा जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाला मिळणारे सीना नदी चे पात्र भरपूर वाहत असल्याने पाणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.संततधार पाऊस सुरू आहे.परंडा तालुक्यातील प्रकल्प पाणीसाठाची क्षमता.. सिना कोळेगाव प्रकल्पाची क्षमता 150.49 दलघमीटर साडेपाच टीएमसी आहे.
निम्न खैरी पांढरेवाडी प्रकल्पाची 10.56 दलघमीटर क्षमता आहे.
साकत प्रकल्प 13.590 दलघमीटर क्षमता.
चांदणी प्रकल्प 23.780 दलघमिटर.
तर खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्पाची 10.800 दलघमिटर क्षमता आहे.