गणेश इंगळे
ग्रामीण प्रतिनिधी, अंबिकापुर
अंबिकापुर दि. 12 आँक्टोबर :- समाजामध्ये वयात आलेली तरुणाई केक कापून, धाब्यावर पार्टीत रंगून वाढदिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या सर्व बाबीवर अंकुश ठेऊन, वाढदिवशी आपण काय केले पाहिजे, वाढदिवस कसा साजरा केला पाहिजे याचे आदर्श उदाहरण साथ सेवक फाउंडेशन चे सचिव अंकुश इंगळे यांनी समाजापुढे ठेवले.सकाळीच उठून आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर रक्तदान हे जीवनदान म्हणत आपल्या जन्मदिवशी कुणाला जीवनदान देता यावं यासाठी साई जीवन रक्तपेढी येथे रक्तदान केले. त्यानंतर सूर्योदय बालगृह अकोला येथे जाऊन त्यांना आवश्यक असणारी गॅस शेगडी साथ सेवक फाउंडेशन च्या कडून भेट देण्यात आली.
देशातील युवकांनी आपला जन्मदिवस सामाजिक बांधिलकी जपत व समाजाला आपलं काही देणं लागत या विचारांनी साजरा करावा असे मत साथ सेवक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.अक्षय राऊत यांनी व्यक्त केले.