ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी, उदगीर
उदगीर(जि.लातूर): आज दि १२ ऑक्टोबर रोजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मपाल देवशेट्टे यांचा ५१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यांच्या राहत्या बेळसंगवी गावी व तसेच जळकोट तालुक्यातील विविध ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन हा दिवस विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा केला. महाराष्ट्र शासनाने व आरोग्य खात्याने घालून दिलेल्या शारीरिक अंतर व इतर नियमांचे पालन करून ३५ तरुणांनी रक्तदान करून एक वेगळं उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जळकोट चे तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तथा प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष मन्मथ अप्पा किडे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकने,शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम टाले, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील,भाजपचे जेष्ठ नेते नगरसेवक रमाकांत रायेवार, नगरसेवक शिवानंद देशमुख,महेश धुळशेट्टे,खादर लाटवाले,वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गोविंद भ्रमन्ना,दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव होणराव,नामदेव केंद्रे चेअरमन गणपतराव धुळशेट्टे,बालाजी पवार,धनराज पाटील, ज्ञानेश्वर मुसळे,प्रहारचे संग्राम गायकवाड,अर्चना पाटील,महारुद्र पाटील, अशोक कारभारी,पत्रकार माजिद मोमीन, माधव होणराव,अतिक मोमीन,साहेबराव केंद्रे,पप्पु फुलारी यांच्यासह तालुक्यातील चेअरमन,शेतकरी,व्यापारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी धर्मपाल देवशेट्टे मित्र मंडळाने ग्रामीण रुग्णालय परिसरात पावसाची सर सुरू असतानाही मोठ्या प्रमाणमध्ये वृक्षारोपण केले.ग्रामीण दवाखान्यातील रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने चेअरमन अशोक डांगे,गणपतराव धुळशेट्टे यांनी तालुका चेअरमन संघटनेच्या वतीने व तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने शंकर पात्रे व देशमुख यांच्या वतीने धर्मपाल देवशेट्टे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.या अभिष्टचिंतन सोहळयात धर्मपाल देवशेट्टे यांनी बोलताना जनतेचे प्रेमच मला सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देते असेच प्रेम माझ्या पाठीशी कायम राहू द्या यापुढेही जनतेच्या सेवेत मी सदैव कार्यरत राहील अशी भावनिक साद या सोहळ्यात तालुक्यातील जनतेला घातली.या कार्यक्रमाचे संयोजक बाळू देवशेट्टे,ज्ञानेश्वर भोपळे,धनराज पाटील, मालुसुरे, पिंटू सुतार, अजित मोमीन, जमील भाई,मनोज तागडंपल्ले व इतर तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.