जिल्हा प्रतिनिधी
सूर्यकांत वाघमारे
लातूर.
चाकूर:1 ऑगस्ट/मौजे झरी बुद्रुक येथे एका तेरा दिवसाच्या लहान बाळाला पाण्याच्या टाकीत टाकून खून केल्याची भयंकर घटना 29 ऑगस्ट वार शनिवार रोजी घडली आहे याप्रकरणी चाकूर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून आरोपीचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चाकूर तालुक्यातील हुगडेवाडी येथील एक महिला आपल्या माहेरी झरी बुद्रुक येथे आली होती. त्या महिलेने तेरा दिवसापूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. 29 ऑगस्ट शनिवारी तिचे बाळ अचानक गायब झाले. घरातील माणसांनी सगळीकडे शोध घेतला पण कुठेच मुलगी सापडली नाही. त्याच घरातील एक व्यक्ती पाणी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीकडे गेला. त्याने टाकीचे झाकण उघडताच त्याला बाळ दिसले ही माहिती पोलिसांना कळाल्यानंतर चाकुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड हे आपल्या टीम सोबत घटनास्थळी झरी बुद्रुक येथे पोहोचले व पंचनामा केला. त्यानंतर त्यांनी प्रथम चाकूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली असून आरोपीचा शोध घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पुढील शोध पीएसआय गायकवाड साहेब करत आहेत.

