हानिफ ढोकले
तालुका प्रतिनिधी महाड
रायगड -आज अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मर्यादित अस्तित्व असले तरी ते टिकवून ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत आहोत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आलेली मदत अलिबागच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुका कार्यकारिणीने योग्य नियोजन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक व आभार. यापुढेही आदरणीय खा. तटकरे साहेब, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून अलिबाग मतदारसंघात लोकोपयोगी कामे मार्गी लावत आपल्या पक्षाला बळकटी देण्यासाठी कटिबद्ध राहू.या आढावा बैठकीच्या वेळी आदरणीय खासदार सुनिल तटकरे हस्ते करोनाच्या संकटकाळातही आपले योगदान देणाऱ्या पत्रकार मित्रांचा करोनो योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार जिल्हाध्यक्ष सुरेशजी लाड , जि.प.उपाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा गिताताई पालरेचा, जि.प.सभापती गिताताई जाधव, जि.प.सभापती बबनजी मनवे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष नाझीम हसवारे, विधि व न्यायचे अध्यक्ष अॅड उत्तमराव जाधव, अलिबाग तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणी व पत्रकार मित्र उपस्थित होते.