प्रमोद बोपटे
जिल्हा प्रतिनिधी, अकोला
अकोला दि.17 ऑक्टोंबर :- भारतीय स्टेट बँकेच्या चोहट्टा बाजार शाखेच्या गलथान व अपूर्ण सेवेतील कारभारामुळे शेतकरी, कर्मचारी, सर्व सामान्य ग्राहक त्रस्त झाले असून या शाखेला 65 गावे जोडण्यात आलेल्या गावातील ग्राहकांचे खाते या शाखेत असून गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने ताटकळत बसावे लागत आहे.त्यामध्ये ग्राहकांना देण्यात आलेले पासबुक ला बारकोड लावण्यात आला नसल्याने त्यांना वेळोवेळी खाते पुस्तकात जमा व काढण्यात आलेली रक्कम नोंदविण्याकरिता असलेल्या मशीन चा उपयोग घेता येत नाही. किंवा सदर रकमेची नोंद पुस्तकात करून दिले देण्यात येत नाही. सदर शाखेमध्ये केवळ तीन कर्मचारी कार्यरत असून 65 गावातील ग्राहकांचा विस्तार त्यामुळे त्यांना त्वरित सेवा देण्यास विलंब होत असल्याचे समजताच अकोला जि.प. कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांनी भेट देत बँकेचे व्यवस्थापक यांना ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास अवगत करण्यात आले तसेच व्यवस्थापकाचे मत जाणून घेताना ग्राहकांना व्यवस्थितरीत्या सेवा मिळण्यासाठी कर्मचारी वाढविण्यात यावे याकरिता सूचित करताना याबाबत जिल्हाधिकारी अकोला व बॅंकेच्या सरव्यवस्थापक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मत कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांनी व्यक्त करतांना 65 गावातील लोकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.