.
प्रदीप घाडगे मुख्य संपादक

पवनी: मागील सरकारात रेती चोरी होते म्हणून तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आघाडीच्या नेत्यांनी घेराव केला होता, अधिकाऱ्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी होती, आम्ही कारवाया करत होतो पण आज त्याच नेत्यांच्या आशीर्वादाने रेती चोरी सुरू आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी रेती चोरी बंद व्हावी यासाठी भाजपाला आंदोलन उपोषण करावे लागते ही खेदाची गोष्ट आहे. हे सरकारचे अपयश आहे अशी खंत माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन व्यक्त केली.गेल्या दोन दिवसापासून तहसील कार्यालय पवनीच्या समोर भाजपा तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांच्या नेतृत्वात रेती चोरी बंद व्हावी यासाठी अामरण उपोषण सुरु आहे या उपोषणाला अद्यापही प्रशासना कडूनदखल घेतल्या गेली नाही म्हणून माजी आमदार चरण वाघमारे यांनी फोनवर खडसावले. यावेळी उपोषण करते राजेंद्र फुलबांधे, प्रकाश कुर्झेकर, मच्छिंद्र हटवार, हिरालाल वैद्य,दिपक तिघरे, बंडू बनकर, संदीप टाले, पंकज राठोड, विजय भुरे, दत्तू मुनरतीवार, महादेव शिवरकर, गुलाब वैद्य, विनोद धारणे, संदीप नंदरधने, गिरीधर उरकुडकर, राहुल माथुरकर लोकेश दडवे, मयूर रेवतकर,माधव वंजारी आणि बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

