किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी पातूर
न्यूज-24 मराठी
राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश पात्र परीक्षेचा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून यामध्ये पातूर येथील कुमारी आचल प्रशांत काळपांडे या विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवूनप्रभात किड्स अकोला या महाविद्यालयातून तिने प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे तर ग्रामीण भागातून पातुर तालुक्यात सुद्धा प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे
कुमारी अाचल 99.65% गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे तिला 646 गुण मिळाले आहेत तर तिला बारावी मध्ये सुद्धा 93 टक्के गुण होते अतिशय काबाडकष्ट कठोर मेहनत आणि अभ्यासाचे सातत्य ठेवून तिने अभ्यास केल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे तसेच यशाचे श्रेय गुरुजन आणि शिक्षक शिक्षिका असलेल्या आई-वडिलांना देत आहे कोरोना मुळे लॉक डाऊन ची स्थितीअसतांनासुद्धा तिने वेळेचा सदुपयोग करून ऐतिहासिक असा यशाचा पाया रोवला आहे त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मुली कुठेच कमी नसल्याचे तिने दाखवून दिले आहे त्यामुळे या गुणवत्तेची दखल घेऊन पातुर संस्कार भारती शाखेच्यावतीने रविवारी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून कुमारी आचलचा संस्कार भारती शाखेचे अध्यक्ष प्राध्यापक विलासराव राऊत, पातूर येथील किड्स पॅराडाईज शाळेचे अध्यक्ष गोपाल गाडगे तसेच संदीप देउळगावकर ,पत्रकार देवानंद गहिले आदींनी तिचा सत्कार करून गौरव केला आहे यावेळी ज्येष्ठ गायक देविदास निलखन ज्येष्ठ भजन गायक दादाराव राखोंडे ज्येष्ठ नाट्य कलावंत गजानन भाऊ पोपळघट प्राध्यापक वसंत गाडगे तसेच काजलचे आई-वडील या कार्यक्रमाला उपस्थित होते याप्रसंगी ग्रामीण भागातील रुग्णांची सोय व्हावी आणि गोरगरिबांना चांगल्या आरोग्य करता सेवा देता यावी म्हणून मला एमबीबीएस करून मोठे डॉक्टर व्हायची इच्छा आचल ने बोलून दाखविली आहे