मितेश महाले
ग्रामीण प्रतिनिधी पोलादपूर
महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांच्या बिरवाडी येथील निवास्थ्यांनी शिवसैनिकांचे सभासद अर्ज भरण्याची सुरवात करण्यात आली असून, महाड विधानसभा मतदार संघांचे आमदार भरत गोगावले यांचा पहिला सभासद अर्ज भरण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत मतदार संघातील सर्व शिवसैनिकांचे सभासद अर्ज भरून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत. आमदार भरत गोगावले यांचा अर्ज भरताना युवा सेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक युवा सेना तालुका अधिकारी सिद्धेश पाटेकर व महाड संपर्क प्रमुख विजय सावंत उपस्तित होते.