शरण खन्ना
उपजिल्हा प्रतिनिधी
ठाणे
ठाणे १९ ऑक्टोबर : शहरातील दोन वेगवेगळ्या तलावांमध्ये एक महिला आणि एक किशोरवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती अधिकारी यांनी सोमवारी दिली.प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (आरडीएमसी) प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास महानगरपालिका मुख्यालया जवळील कचराळी तलावात ३५ ते ४० वर्षे वयोगटातील अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. दुसर्या घटनेत येथील चरई परिसरातील रहिवासी असलेले एक १६ वर्षीय मुलगा रविवारी सायंकाळी शहरातील उपवन तलावामध्ये बुडून मृत्यू झाला, अशी माहिती अधिकारी याने दिली.आरडीएमसी आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला, असे ते म्हणाले.त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.