शरण खन्ना
उपजिल्हा प्रतिनिधी
ठाणे
ठाणे २२ ऑक्टोबर :एकीकडे कोरोना प्रादुर्भावला आळा बसावा म्हणून विविध उपाय योजित असताना यावर्षी येणा-या दिवाळी मध्ये फटाके विक्री व वाजविण्यास बंदी आणावी अशी मागणी शहर (जि.)काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे येणारया दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातील व त्यामूळे मोठ्या प्रमाणावर वातावरणात प्रदूषण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रदूषणचा परिणाम कोरोना रूग्ण वाढीस कारण ठरू शकते व कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्रासदायक ठरेल म्हणून या दिवाळीच्या कालावधीत फटाका विक्री व वाजविण्यावर पूर्णता बंदी आणावी जेणेकरून काही प्रमाणात कमी होत असलेल्या रूग्णाची सख्या आपण नियंत्रण करू शकतो अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.