ताज्या घडामोडी

गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन १ तारखेला होण्यासाठी सिएमपी प्रणाली सुरु करा महा.राज्य प्राथमिक शिक्षक संघाची निवेदनाद्वारे जि.प.प्रशासनाकडे मागणी

निलीमा बंडमवार
ग्रामिण प्रतिनिधी पेरमिली

गडचिरोली/पेरमिली – गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे व केंद्रप्रमुखांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी निश्चित धोरण ठरवुन लवकरात लवकर सिएमपी (CMP) प्रणाली सुरु करावी,अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघातर्फे जि.प.प्रशासनाकडे केली. दिनांक २०/१०/२०२० ला जि.प.गडचिरोली प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन अधिक्षक बारेकर यांची प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांचे वेतन सिएमपी प्रणाली द्वारे करण्यात यावे यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आणि यासंबंधातील तसे मागणीचे निवेदन जि.प.अध्यक्ष,जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती,मुख्यकार्यकारी अधिकारी,मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांना दिलेले आहे निवेदनात दरमहा १ तारखेला वेतन द्यावे असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.माञ आपल्या गडचिरोली जिल्ह्यात मागील ६ महिण्यापासुन प्रत्येक महिण्यात एक ते दिड महिणा उशीरा वेतन मिळाले आहे.नेहमीच वेतन उशीरा मिळत असल्याने विवीध पतसंस्था व बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते उशीरा पोहोचल्याने जास्तीच्या व्याज आकारणीचा फटका प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखांना सहन करावा लागत असल्याकडे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार,जिल्हा कार्याध्यक्ष शिलाताई सोमनकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक राॅयसिडाम,जिल्हा संघटक निलकंठ निकुरे,धानोरा तालुका संघटक जितेद्र रायपुरे यांनी आजच्या चर्चेत वेतन अधिक्षक बारेकर यांचे लक्ष वेधले यावर बारेकर यांनी वेतन वेळेवर होण्यासाठी पुढील काही महिण्यात CMP प्रणालीद्वारे वेतन करण्यासाठी निश्चित योग्य ते पाऊल उचलल्या जाईल,असे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. माहे सप्टें.व आॅक्टों.२०२० चे वेतन आणि दिवाळी सणासाठी देय असलेले साडेबारा हजार रुपये सण अग्रीम पगारासोबत दिवाळीपुर्वीच देण्यात यावे अशी मागणी सुद्धा आजच्या भेटीत शिक्षक संघाचे वतीने करण्यात आली,यावर चर्चेत बोलतांना बारेकर यांनी माहे सप्टें व आॅक्टों २०२० चे वेतन आणि सण अग्रीम हे निश्चित नोव्हें.च्या पहिल्या आठवड्यात ६ तारखेपर्यंत देण्याचे मान्य केले जिल्ह्यातील विवीध पं.स.तील शिक्षण विभागाकडून प्रलंबित आर्थीक प्रकरणे निकाली काढण्यासाठी मागील काही महिण्यांपासुन आॅफलाईन ग्रॅंट ची मागणी करण्यात आलेली होती,ही प्रलंबित आर्थीक प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली तरतुद संबंधित पं.स.ना यथाशिघ्र पाठविण्यात यावी,यासाठी सुद्धा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मागणी करुन बारेकर पाठपुरावा केला आहे.यावर बोलतांना बारेकर म्हणाले की जिल्ह्यातील पं.स.च्या गटशिक्षणाधिकारी यांनी दर तीन महिण्यांनी सादर करायच्या ञैमासिक बजेट मध्ये आवश्यक असलेल्या रकमेची जि.प.कडे मागणी करायला पाहीजे होती.परंतु ब-याच पं.स.मधुन अशा प्रकारे ञैमासिक बजेट मधुन आवश्यक असलेल्या रकमेची मागणी आलेली नाही.ञैमासिक बजेटमधुन मागणी न आल्यामुळे त्या रकमेची मागणी शासनाकडे करता आली नाही,पर्यायाने रक्कम प्राप्त न झाल्यामुळे जि.प. शिक्षण विभागाकडून बहुतांश पं.स.ना प्रलंबीत आर्थिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम पाठवीता आलेली नाही,असे जि.प.चे वेतन अधिक्षक बारेकर यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाशी चर्चेवेळी सांगितले आहे. त्याच प्रमाने आँगष्ट२०२० च्या वेतन विलंबा बाबत सद्यस्थिती काय आहे हे प्रत्यक्ष लेखा विभागात जाऊन पाठपुरावा करून जाणुन घेतले असता नुकतेच वेतन बील जिल्हा कोशागारातुन पास झालेले असुन ते पास झालेले वेतन बील आणण्यासाठी शिक्षण विभागातील संबंधित क्लार्क कोशागार कार्यालयात गेलेली आहे.वित्तप्रेषण उद्याला येईल असे सांगण्यात आले. यासह शिक्षण व लेखा विभागाशी संबंधित विवीध प्रलंबित समस्यांची निवेदना द्वारे मागणी जि.प.प्रशासनाकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली च्या शिष्ठमंडळाने केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close