ताज्या घडामोडी

उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव कोविड मुक्त

ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर

उदगीर (जि.लातूर) आज दि.२३ ऑक्टोबर रोजी उदगीर चे माजी आमदार सुधाकर भालेराव कोविड मुक्त झाले.चेन्नई येथील प्रवासादरम्यान त्यांना कोरोना ची लागण झाली होती.चेन्नई येथे उपचार न घेता ते आपल्या कर्मभूमी उदगीर येथे परत येऊन उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाले.पुणे,मुंबई येथे लाखो रुपये खर्चूनही न मिळणारी आरोग्य सुविधा आता उदगीर मधे मिळत असल्याने मी कोरोना बाधित झाल्या नंतर उपचार लाईफ केअर येथेच घेण्याचे ठरविले आणि हा विश्वास सार्थकी लागला.जनतेच्या आशिर्वाद आणि लाईफ केअरची टीमने केलेले योग्य उपचार यामुळे माझा पुनर्जन्म झाला असल्याचे माजी आमदार सुधाकर भालेराव यानी सांगितले.श्री भालेराव यांचा उपचारा नंतर लाईफ केअर येथे सत्कार करुन बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुरेश वाघ यांच्या हस्ते कोरोना योद्धा हे सन्मान पत्र देण्यात आले.गुरुवार ता.22 रोजी त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्यानी नागरीकानी कोरोना झाला तर घाबरुन न जाता लाईफ केअर हॉस्पिटल मधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि अनुभवी डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाने आजारा पासुन मुक्त व्हावे असे आवाहन केले.ईतर आजार अर्थात कोरोना नसलेल्या नॉन कोविड रुग्णासाठी स्वतंत्र आय सी यू,स्वतंत्र नर्सिंग कर्मचारी,स्वतंत्र वार्ड़ अशी व्यवस्था करण्यात आली आहे.गरजू रुग्णासाठी महात्मा फ़ुले जन आरोग्य योजने आंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे श्री भालेराव यानी सांगितले.यावेळी सी एफ ओ अमोल भालेराव,डॉ ज्ञान विकास,डॉ शिवराज सुर्यवंशी,मिलिंद घनपाठी,डॉ श्याम हिबाने,राजगोविंद कारभारी,किरण पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर,नर्स,आणि कर्मचारी उपस्थीत होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close