ताज्या घडामोडी

विलासराव देशमुख युवा मंच व युवक कॉंग्रेसकडून नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन


रोहित अपसिंगेकर शहर प्रतिनिधी रेणापूर


रेणापूर शहरातील संभाजीनगर ,सरोजनी राजे नगर , नगरपंचायत ते बसवेश्वर चौक ,काळेवाडी ,रेणुकानगर, माउली नगर ,कुंभार गल्ली ,कुरे गल्ली , रेड्डी कॉलनी असेच ज्या ज्या ठिकाणी कच्चे रस्ते आहेत आणि ज्या भागात मागील झालेल्या पावसामुळे चिखल झाला आहे, तेथे मुरूम टाकून रस्ता करण्यासाठी व सर्व रस्त्याचे पक्के रस्ते करण्यासाठी ठराव घेऊन ते रस्ते पक्के करावे , सन २०१९ मध्ये झालेल्या पाणी टंचाई काळात ज्या लोकांचे बोअर अधिग्रहण केलेले होते , त्या लोकांचे बिल अद्याप वाटप करण्यात आले नाही ते बिल अदा करून बोअर अधिग्रहण केलेल्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात यावे ,स्वच्छता विभागामार्फत नाली सफाई शहरात व नगरपंचायत हद्दीत व्यवस्थितरीत्या होत नसल्याने व अपुर्या कर्मचारी कामावर असल्याने स्वच्छता पूर्ण होत नाही त्याबाबत चौकशी करून कार्यवाही करावी , संजय नगर रेणापूर ते काळेवाडी येथील राहणाऱ्या कुटुंबाला कबाले द्यावे तेथील रहिवाशी घरकुल योजना व अन्य कामासाठी हक्काचे घर देण्यात यावे,रेणापूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावे आदी मागण्यांसाठी विलासराव देशमुख युवा मंच रेणापूर शहर व युवक कॉंग्रेस यांच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या सर्व प्रश्नांबद्दल गांभीर्याने दखल नाही घेतल्यास मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल , असा इशारा देण्यात आला .यावेळी सचिन पुंडलिकराव इगे ,प्रदीप काळे ,रोहित गिरी , सचिन खटाळ, सतीश चव्हाण , मनोहर शेंदरकर ,रोहित अपसिंगेकर,नागनाथ शेंदरकर , महादेव घोडके , शिवाजी चव्हाण , सचिन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close