विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी.परंडा
परंडा:-परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु)येथील युवकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर असलेल्या लाॅकडाऊन काळाचा चांगला फायदा घेत, यावर्षीचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करत,गावाच्या विकासाचा विचार करून स्वच्छते सोबतच वृक्षारोपणाचा संकल्प करून कोरोनाच्या संदर्भाने लॉकडाऊन असताना संकटाचे सुवर्णसंधीत रूपांतर करून गावच्या तरूणाईने सकारात्मक आणि सर्जनशील कार्य केले आहे. गावचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गुगळाई माता मंदीर परिसरात विजया दशमीच्या मूहर्तावर 101 झाडांची लागवड केली. व लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी गुगळाई मंदीर ट्रस्टच्या वतीने झाडे व पाईपलाईन,भगवान बोबडे यांनी 1000 लीटर पाणी क्षमता असणारी टाकी भेट दिली तर डॉ. महेश देवकर यांनी प्रत्येक झाडासाठी ठिबकसिंचन सुविधा उपलब्ध करून दिली.वनराईचे जतन करण्यासाठी जि.प.शिक्षक अतुल देवकर यांच्या संकल्पनेतून अनावश्यक खर्च टाळून, खैरी तीरावर वसलेल्या गुगळाई माता मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले “स्वच्छ गाव, हरित गाव” ही संकल्पना राबवण्यासाठी वृक्षारोपण करून इतरांना आदर्श निर्माण करून दिला आहे. याबद्दल सर्व तरुणांचे कौतुक होत आहे.यावेळी ग्रामपंचायतचे सदस्य डॉ.महेश देवकर,अमर देवकर,गणेश जाधव,केशव देवकर,अतुल देवकर,रविंद्र देवकर,अमोल देवकर,सुनिल सोनार, बुवासाहेब देवकर, भगवान अनभुले,भारत रुईकर, आजिनाथ देवकर,गोकुळ तळेकर,संजय देवकर,मच्छिंद्र अनभुले,गोरख अनभुले उपस्थितीत होते.