प्रा.अक्षय पेटकर
उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तहसिल येथे”कृषि पदवीधर संघटनेच्या” माध्यमातून तालुका कृषी अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले संदर्भात कृषि पदवीधर संघटना जिल्हा अध्यक्ष कृषिश्री. भुषण तडस यांनी निवेदन सादर केले होते,या अनुषंगाने तालुका कृषि अधिकारी मा.श्री.गायकवाड साहेब यांनी सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन, संघटनेच्या पदाधिकारी याना आमंत्रित करून सर्व शेतकऱ्यांना भरपाईची हमी देऊन नुकसानभरपाई करीता पंचनामे करून नुकसान भरपाई साठी अत्यन्त मोलाचे सहकार्य लाभले आहे,
त्याच बरोबर कृषी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून करीत असलेल्या कामकाज बद्दल मा.कृषि अधिकारी यांनी कौतुक केले विशेषतःयासाठी वर्धा जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष कृषीश्री.भुषण तडस याचे नेतृत्वाखाली उपाध्यक्ष कृषिश्री.राहुल चाफले,सचिव कृषिश्री. गणेश शहारे,कार्यध्यक्ष कृषिश्री. हर्षल आवारी,व हिंगणघाट तहसिल अध्यक्ष प्रतिक बोकडे,सचिव अविनाष तिखट,कार्यध्यक्ष गणेश विहिरकर,शहर सचिव अक्षय वाघमारे,सदस्य स्वरूप दुधे,सफल भोंगाडे संकेत दडमल यांनी परिश्रम घेतले

