विनोद कासारे
शहर प्रतिनिधी महाड
वाळण विभागात काँग्रेस ला खिंडार, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंदेरी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत विजयादशमीच्या मुहूर्तावर आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आणि रायगड जिल्हा युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत सदर पक्षप्रवेश शिवनेरी या निवासस्थानी पार पडला, या पक्ष प्रवेश सोहळ्या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, संजय शिंदे, इम्रान पठाण, भगवान पवार, गणपत पवार, अशोक परते, संतोष पवार, राकेश घाग, अमर जंगम, इत्यादी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते, आणि काँग्रेस मधून प्रवेश करणारे – संजय लाड, सुदाम लाड, हरीचंद्र लाड, घनश्याम लाड, अनंत पवार, चंद्रकांत लाड, अक्षय लाड, प्रमोद लाड, किसन पवार, काशिनाथ पवार, सुनील लाड यांच्या समवेत असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत केला प्रवेश, पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आमदार भरत गोगावले यांनी आश्वासन देऊन प्रवेश कर्त्याच्या गळ्यात भगवी पटी टाकून पक्षात सर्वांचे स्वागत केले.