नेरी प्राथमिक आरोग्य सर्व सोयी सुविधा नी स्वयंपूर्ण –डॉ आर आय कोवाचे
विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर/- चिमूर तालुक्यातील नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि सोसिअल माध्यमातून द्वेषातून आणि आकसापोटी अनेक आरोप केले जात आहेत परंतु त्या आरोपात तथ्य नसुन सर्व धंदात खोटे असून नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सोयींनी स्वयंपूर्ण आहे. सविस्तर वृत्त असे की नेरी येथील सौ दर्शना दडमल वय 27 वर्षे ही गरोदर महिला बाळनतपणा साठी आरोग्य केंद्रात आली होती त्या गरोदर महिलेची तपासणी केली असता ती अति जोखीम माता होती तिची तपासणी केल्यानंतर तिला पुडील उपचारासाठी तात्काळ खाजगी गाडी बोलावून रेफर स्लिप द्वारे चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आणि याबाबत सर्व सूचना तिच्या सोबत असणाऱ्या कुटूंबियांना देण्यात आल्या परंतु मातेची तपासणी करण्यात आली नाही आणि हाकलून लावले हे सर्व आरोप धंद्यात खोटे आहे तसेच रुंगणवाहिके संदर्भात केलेले आरोप चुकीचे असून या आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका 7 दिवसांपूर्वी पासून दुरुस्ती करीता चंद्रपूर ला गेली आहे औषध साठा उपलब्ध आहे आणि त्याचे वितरण योग्य प्रकारे सुरू आहे फक्त फार्मासिस्ट नसल्यामुळे नर्स औषधे वितरित करीत आहे केंद्रामध्ये पाण्याची सोय नसल्याचे आरोप होत आहेत परंतु पाणी योग्य प्रकारे मिळत असून नुकतेच आरो चे दुरुस्ती करून पाणी मुबलक उपलब्ध करून दिल्या जात आहे तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ही बाब संबंधित विभागाला निवेदन अर्ज व सूचना देऊन ही पूर्ण केली जात नाही ह्यात आरोग्य केंद्राचा काय दोष आहे असा प्रश्न निर्माण होते या आरोग्य केन्द्रात गरोदर मातांना भरतीपासून तर प्रसूतीनंतर सुट्टी मिळेपर्यंत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते तसेच नियमित लसीकरण केल्या जाते तसेच छापील बाह्य रुग्णपत्रिका छापायला दिली असून लवकरच रुग्णाला मिळेल या आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्व रुग्णाचे तपासणी योग्य प्रकारे केली जात असून चांगल्या प्रकारे उपचार केल्या जाते कुठल्याही रुग्णाची हय गय किंवा हेळसांड केली जात नाही अशी माहिती या आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ आर आय कोवाचे यांनी दिली आहे

