राहुल जाधव
ग्रामीण प्रतिनिधी वाशिम
वाशिम : गेल्या बरेच दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात संततधार पाऊस झाला यामुळे मूग उडीद व इतर खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अगोदरच दुबार पेरणी मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे विशेषता मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी आपण संबंधित शेतकऱ्याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी करणारे कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य, राज पाटील गोटे जिल्हा प्रभारी, श्री शंकर तोटावर जिल्हा कृषी अधिकारी वाशिम याच्यमार्फत कृषीमंत्री मा, श्री, दादाजी भुसे यांना देण्यात आले यावेळी अजय तोडकर वाशिम तालुका अध्यक्ष, मंगेश पोपळघट वाशिम तालुका उपाध्यक्ष, स्वप्नील जाधव विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

