ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर (जि.लातूर) राहुल रतीकांत अंबेसंगे यांनी त्यांचा या वर्षीचा वाढदिवस साजरे न करता त्यांनी या वर्षी हा आनंद उदगीर येथील बेघर निवारा केंद्र येथील गरजूंना उबदार कपडे देऊनसाजरा केला.तसेच उदगीर येथील विविध सार्वजनिक ठिकाणी निवारा नसलेल्या नागरिकांना ब्लँकेट वाटप केले.दर वर्षी ते वाढदिवस रक्तदान शिबिर साजरे करत असताना या वर्षीच्या कोविड च्या काळात त्यांनी ही संकल्पना घेऊन गरजूंना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला.यावेळी जय चिंचोळे, तेजस अंबेसंगे,योगीराज माने व बेघर निवारा केंद्राचे कर्मचारी आणि टीम उपस्थित होती.