मितेश महाले
तालुका प्रतिनिधी माणगांव
ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या करिता सेवा भावी वृतीने प्रतिवर्ष सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्षैक्षणिक संच यामध्यें दप्तर ,वह्या,रंगपेटी कंपासपेटी या सारख्या वस्तूंचा संच भेट दिला जातो.या वर्षी जगभरात करोना महामारीचे सावट असतानाही सेवा सहयोग यांच्या मार्फत १५ शाळां विद्यार्थ्यांना वह्याचे संच दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात माणगाव तालुक्यातील १५ शाळांना ९५ हजार रुपये किमतीच्या वह्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई सहयोगी प्रोजेक्ट मॅनेजर दीपाली देवळे,राम रोकडे रातवड विद्यालयाचे मुख्याधापक महादेव सखाराम जाधव सर व शाळांचे मुख्याधापक व शिक्षक उपस्थित होते. करोना महामारीच्या संकटात क्षैक्षणिक मदत प्राप्त झाल्यामूळे सामाजिक व क्षैक्षणिक क्षेत्रातून सेवा सहयोग फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.