ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर चा पर्यावरण पूरक प्रवासाचा वारसा पुढे नेत पोस्ते पोदार लर्न स्कूल चे कला शिक्षक जहांगीर पटेल यांनी उदगीर करांसाठी पर्यावरणपूरक दीपावली कंदील बनवून ही दिवाळी विशेष केली आहे.
त्यांच्या सामजिक योगदानाची दखल घेत आज पर्यंत विविध पुरस्कार त्यांना दिले आहेत.
उदगीर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले असून त्यांच्या या कागदा पासून बनवलेल्या कंदिलाचा वापर या दिवाळीसाठी करून एक वेगळा संदेश दिला.यापुढे जाऊन कलशिक्षक जहांगीर पटेल यांनी ही कला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकऊन ही पर्यावरणाची नांदी घरोघरी पोहचवली आहे.प्लास्टिक बंदी करून या समस्या सुटत नसून ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी न्यूज २४ मराठी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.त्यांच्या या कामाचे कौतुक पोस्ते पोदार लर्न स्कूल चे सचिव सूरज पोस्ते आणि प्राचार्य सूर्यकांत चवळे यांनी केले.