मृत्यूचे शव ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१५ नव्हें.)- नागभिड तालुक्यातील म्हसली येथील निखिल पंढरी कुमले वय 22 वर्ष हा जंगलात म्हसी चरायला घेऊन गेला होता. दिवाळी असल्याने म्हसीची धूनी करण्यापेक्षा म्हसी तेली मेंढा तलावात सोबतीचे साह्याने दोघेही म्हसीसोबत पोहायला गेले. एक बाहेर निघाला. यालाही तू बाहेर ये असे सांगितले पण तो पोहून येतो म्हणताच पाण्यात बुडायला लागला. त्याने ही बातमी म्हसली येथे देण्यात येताच गावकरी तलावाकडे धाव घेतली पण शोध घेत असता सापडला नाही. ही हकीकत पोलीस पाटील तेली मेंढा यांना मिळताच पोलीस स्टेशन नागभिड येथे तक्रार दाखल करण्यात आली. नागभिड पोलिसांनी मृत्यूचे शव ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदन करण्याकरिता पाठविले. दिवाळीचे दिवशी घटना घडली असल्याने म्हसली गावावर शोककळा पसरली असून कुमले कुटुंबावर संकट आलेले आहे. नागभिड पोलिसांनी मृत्यूचे कारण अकास्मिक अपघात झाला असून पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सोनेकर व पो.ह. आंबेरकर करीत आहे.