सोनेराव गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी
गंगापूर.
गंगापूर/ गंगापूर येथे विजेचा शॉक लागून सालगडी नवनाथ रघुनाथ गायकवाड जागीच ठार झाला . सविस्तर असे की दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी गाव गंगापूर तालुका लातूर जिल्हा लातूर. येथील रहिवाशी भाऊसाहेब नारायण मिंड ग्रामपंचायत सदस्य यांच्या शेतामध्ये नवनाथ रघुनाथ गायकवाड हे सालगडी म्हणून कामाला होते. शेतामध्ये ट्रॅक्टर वर रोटर करत असताना अचानक ट्रॅक्टरचा धक्का शेतातून गेलेल्या लाईटच्या पोलला लागला आणि जागीच पोल कोसळला आणि ट्रॅक्टरला पुलावरील तार चिकटली व जागीच ट्रॅक्टर ने पेट घेतला. यामध्येच नवनाथ रघुनाथ गायकवाड वय 40 यांचा जागीच शॉक लागून मृत्यू झाला. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ही घटना घडली लगेच काही गावकऱ्यांनी जवळच असलेल्या लातूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले पण त्याचा काही फायदा झाला नाही. आज गायकवाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली एक मुलगा व आई-वडील असा परिवार आहे. गंगापूर या गावात रात्री कोणीही चुल पेटवली नाही. पूर्ण गाव शोकसागरात बुडून गेले गायकवाड परिवाराला या दुःखातून सर्वतोपरी सावरण्यासाठी शासन स्तरावर मदत केली जाईल असे मत लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.