पातुर शहरात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी घेतला भाग

तहसील कार्यालय पातूर येथे निवेदन देण्यात आले
किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी पातूर
न्यूज-24 मराठी
पातूर येथील संभाजी चौक महात्मा फुले स्मारक येथे समता परिषद तसेच सर्वपक्षीय ओबीसी समाजातील नेत्यांनी ओबीसी बचाओ आंदोलनामध्ये सहभाग घेऊन महात्मा फुले स्मारक तहसील कार्यालयापर्यंत कोरोना नियमांचे पालन करून मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वांनी चर्चा करून महाराष्ट्रा सारख्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या राज्यात ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याया विरोधात पातुर येथील ओबीसी बांधवांनी रोष व्यक्त केला व मराठा समाजाला ओबीसीत घालून दोन्ही समाजात भांडणे लावणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याचे गरज असल्याचे बोलत होते व ओबीसी आरक्षण पळवून नेणे चा कट मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा नेते व न्याय गायकवाड आयोगाचे सर्व क्षणाची कंत्राट होणाऱ्या छत्रपती शिवाजी प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सराटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे ती स्वीकारली गेली आहे लवकरच तिची सुनावणी होईल सराटे यांनी राज्यातील सर्वच्या सर्व ओबीसी एसबीसी जाती जमातीचे आरक्षण बंद करण्याची मागणी केली आहे याचा अर्थ 1950 पासून अस्तित्वात असलेले आरक्षण 1967 पासून मिळणारे ओबीसी आरक्षण व 1990च्या दशकात सुरू झालेले एसबीसी न्यायालयाच्या मार्गांनी रद्द करण्याचा कट आखण्यात आलेला आहे त्यासाठी दिलेली कारणे निराधार कपोल कल्पित आणि ओबीसी देशावर आधारलेली आहेत या जाती-जमातीच्या कोणत्याही फार अभ्यास न करता त्यांना आरक्षण दिलेले आहे हा सराटे यांचा आक्षेप बिनबुडाचा आहेप्रत्यक्षात बिडी देशमुख आयोग मंडल आयोग मुटाटकर समिती न्याय खत्री आयोग न्याय बापट आयोग सराफ आयोग यांनी सखोल अभ्यास करूनच या जाती जमातींना आरक्षण दिले लेआहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे असेच आमचे मत आहे त्यासाठी ओबीसींचा ताटातला घास पळवला जाऊ नयेओबीसीच्या गोट्याला हात न लावता मराठा बांधवांना वेगळे आरक्षण जरूर द्यावे अशी मागणी समता परिषद व सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी केली आहे व येत्या 2/ 12 /2020 रोजी अकोला शहरामध्ये ओबीसी बांधवांना मोर्चा करिता हजर राहण्याचे आव्हान प्रा तुकाराम बिडकर समता परिषद यांनी केले आहे