ताज्या घडामोडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात
अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चालकासह १६ जण जखमी

मंगेश थोरात शहर प्रतिनिधी मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटीचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मध्यरात्री दीड वाजता हा अपघात झाला. ही एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे होती. पनवेल हद्दीजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चालकासह १६ जण जखमी झाले आहेत. आयआरबी आणि वाहतूक पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील मृत व्यक्ती मुंबईत बेस्टचा चालक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close