ताज्या घडामोडी

पळसगांव येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकाचे वाचन

विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर/- चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव (पि) येथे भारत देशात भारतीय संविधान लागू झालेल्या घटनेला ७० वर्षें पूर्ण झाली. यानिमित्त संविधान दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा पळसगांव च्या वतीने आज नालंदा बौद्ध विहाराच्या आवारात संविधान दिनाचा व क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन करण्यात येऊन. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले .संविधान दिनाच्या निमित्य पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी मान्यवर मंडळी अखिल भारतीय बौद्ध महासभा अद्यक्ष,दामोदर रामटेके व सचिव,प्रभाकर गजभिये महामाया महिला मंडळ च्या अद्यक्ष ,सुनीता भीमटे व सचिव सुनीता पाटील व बौद्ध उपासक उपसिका उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close