ओमकार गांजुरे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर(जि.लातूर) :- आज दि.२६ नोव्हेंबर रोजी उदगीर येथील अग्रगण्य अशा पोस्ते पोदार लर्न स्कूल मधे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव श्री.सूरज पोस्ते,शाळेचे प्रिन्सिपल श्री सूर्यकांत चवळे यांची उपस्थिती होती.प्रथम संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.प्रिन्सिपल श्री. सूर्यकांत चवळे यांनी उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्याना संबोधित करत संविधानाचे महत्व विषद केले आणि संविधानाप्रति आदर,सन्मान आणि त्याची प्रतिष्ठा राखत काम करण्याचे आवाहन केले.यावेळी शाळेचे सिनियर कोवार्डिनेटर शेषराव बिरादार,मिडल कोर्डिनेटर डॉ मुबारक मुल्ला,प्रायमरी कोर्डिनेटर वनिता सुगंधी,आक्टिविटी कोर्डिनेटर जशन डोळे,हौबी कॉर्डिनेटर सावन जाधव,शाळेचे एडमिन अतुल करखेलीकर,उमाकांत पाटील,गजानन फुलारी आणि इतर शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.