ताज्या घडामोडी

भद्रावती येथे 26/11 च्या मूबंई हल्यातील जवानांना श्रद्धांजली

जयहिदं फाऊंडेशनचा ऊपकम

महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती

भद्रावतीदि26:-येथील२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं.या वीर भरातपुत्र जवानांना आज जयहिंद फाउंडेशन च्या वतीने भद्रावती येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली त्यावेळी जयहिंद फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष मा.श्री. विजय तेलरांधे, जिल्हा सचिव मा. श्री.अनुप नेहारे, जिल्हा कोषाध्यक्ष मा.श्री.पंकज पांढरे, जिल्हा प्रचार आणि प्रसार प्रमुख मा.श्री. श्रीपाद बाकरे, सौ. दर्शना तेलरांधे, सौ.कविता क्षिरसागर आणि जय जवान जय किसान पूर्व पोलीस भरती प्रशिक्षण चे विध्यार्थी आणि आर्मी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close