ताज्या घडामोडी

बहुजन समाज पार्टी, विधानसभा क्षेत्र अहेरी तर्फे संविधान दिवस पार पाडले.

राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ उपसंपादक गडचिरोली

अहेरी – प्राणहिता पोलिस कॅम्प समोर डॉ. दुपारे यांच्या पटांगणात, दिनांक 26/11/2020 रोजी दुपारी 1.30 वाजता विशेष सभेचे व संविधान दिनाचे निमित्त आयोजन करण्यात आले. विधानसभा अहेरी क्षेत्राचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते, यावेळी पक्ष वाढीकरिता पुढील नियोजन यावर विशेष मार्गदर्शन तथा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय सध्यास्थित घडामोडी आणि समोर येणारे परिणाम यावर मान्यवर पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
सदर सभेला गणपत तावाडे जिल्हा प्रभारी, शंकर बोरकुट जिल्हा अध्यक्ष बसपा गडचिरोली, गिरिराज महेश्वरी जिल्हा सचिव बसपा गडचिरोली यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सभेला अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष खुशाल डोंगरे, महासचिव रमेश उइके, कोषाध्यक्ष नारायण आलोने, सर्व विधानसभा सचिव, अहेरी तालुका अध्यक्ष शंकर आलोने, मुलचेरा तालुका अध्यक्ष गोमासे साहेब सीरोंचा तालुक्याचे तालुका अध्यक्ष रमेश गावडे, व बहुजन वोलिंटियर फोर्स चे संयोजक प्रीतम झाडे, तालुका सचिव,उपाध्यक्ष, सर्व तालुक्यातील विविध सेक्टर चे सचिव, सेक्टर पदाधिकारी, व बूथ पदाधिकारी आणि कार्यकर्ते बिवीएफ पदाधिकारी आदी सर्वांनी उपस्थिती होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close