पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : माजरीवरून भद्रावती शहराकडे येत असलेल्या दुचाकी वाहनाला एका अज्ञात वाहणाने दिलेल्या धडकीमुळे झालेल्या अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीररीत्या जखमी झाला. सदर घटना दि.04 डिसेंम्बर ला पहाटे 6:30 वाजताच्या सुमारास भद्रावती शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढा नाल्याजवळ घडली. त्यात अब्दुल वहाब वय 50 वर्ष हे मृत इसमाचे नाव असून गंभीर जखमी झालेल्या दीपक गुप्ता वय 31 वर्ष याला उपचारासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले.व मृतक ला शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. माजरी येथील अब्दुल वहाब व दीपक गुप्ता हे दोघे एम.एच.34 BK 1957 या क्रमांकाच्या दुचाकीने भद्रावती शहराकडे येत असतांना कोंढा नाल्याजवळ चंद्रपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहणाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली यात अब्दुल वहाब यांचा जागीच मृत्यू झाला असून दीपक गुप्ता गंभीर जखमी झाला. भद्रावती पोलीसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.