महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.१६:- येथील महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीत प्रा.ज्ञानेश हटवार यांची चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.सुनील डिसले बारामती व सचिव प्रा.बाळासाहेब माने मुंबई यांनी त्यांची निवड केली.मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरीता शिक्षकांचे संघटन
करण्यात आले .प्रा.हटवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे,प्रा.सुरेश परसावार, प्रा. रमेश बारई, डॉ. सुधीर मोते, डॉ.माधवी भट, प्रा.किशोर ढोक यांनी अभिनंदन केले आहे.

