सोनेराव गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी,गंगापूर
लातूर:-भूमीअभिलेख विभाग,ग्रामविकास विभाग, महसूल विभाग व सर्वे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गावठाण जमावबंदी प्रकल्प (स्वामित्व) योजनेअंतर्गत ड्रोन द्वारे सर्वेक्षणाचे काम लातूर तालुक्यातील १०३ गावामध्ये चालू आहे.दि.५-११-२०२०ते१६-११-२०२० पर्यंत एकूण ६१ गावामध्ये ड्रोनचे काम पूर्ण झाले आहे.जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव,तहसीलदार स्वप्नील पवार, गट विकास अधिकारी
श्याम गोडभरले,उप अधीक्षक भूमी अभिलेख सीमा देशमुख यांनी कोळपा या गावातील ड्रोन सर्वेक्षणाच्या प्रत्येक्ष फ्लाईंगचे प्रात्यक्षित कामाबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.कोळपा गावातील सर्व मिळकतीचे सीमांकना बाबत पाहणी केली,तसेच भूमी अभिलेख विभागाच्या या अभिनव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित केले आहे.