रोहित कोलसकर
उप शहर प्रतिनिधि पोलादपूर
महाड तालुक्यात कोरोना संपूष्टात आल्याच सर्वांना वाटत आहे पण तो सर्वत्र वावरत आहे आज पुन्हा महाड तालुक्यात नवीन कोरोना 04 रुग्ण आढळले तर O बरे झालेत ९ जणांवर उपचार सुरु आहेत, दरम्यान कोरोना अपडेट रोज प्रकाशित होणार्या शासकीय आकडेवारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या जाहिर केली जात नाही, त्यामुळे सध्या महाड तालुक्यात नक्की कोरोना संसर्ग रोग परिस्थिती समजून येत नाही, असे असले तरी सर्वांनी या महामारी रोगापासून दूर रहाण्यासाठी स्वःताची आणि कुंटूंबाची काळजी घेणे गरजेच आहे, महाड तालुक्यात आता पर्यंत एकुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १८३३ झाली आहे, एकुण बरे रुग्ण १७४९ तर ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.