डॉ विवेक शेगांवकर
न्युज 24 मराठी
अकोला दि :-18 आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बोरगांव मंजु पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या महामार्ग कृमांक 6 वर असलेल्या काटेपुर्णा नजीक घडलेल्या एका घटनेमध्ये कोळसा घेऊन चंद्रपूर कडून मुंबईकडे जात असलेला ट्रक काटेपूर्णा नदीवरील पुलावरुन कोसळल्याने चालकाचा ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला असून ट्रक चा वाहक गंभीर जखमी झाला सकाळी पडलेले धुके आणि राष्ट्रीयमहामार्गावर असलेले गड्डे याचा अंदाज न आल्याने सदरची घटना घडली ,
बोरगाव मंजू पो.स्टे. हद्दीतील महामार्गावरील काटेपूर्णा गावानजीक असलेला काटेपूर्णा नदीवरील पुलावरून सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन चंद्रपूर कडून मुंबईकडे जात असलेला ट्रक क्रमांक MH 4B AG 1465 मृतक चालक साहेब खा युसुफ खा रा.पालघर, मुंबई हा औरंगजेब खा हलील खा चे सोबत जात असताना ट्रक पुलाखाली कोसळला यामध्ये मृतक चालक साहेब खा युसुफ खा हा ट्रक खाली सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या औरंगजेब खा हलील खा याला गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्यासह हे.कॉ.दीपक कानडे,राठोड, दिनेश अण्णा, पो.कॉ.योगेश काटकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करण्यात आला असून मृतक चालक साहेब खा युसुफ खा याला ट्रक खालून काढण्यासाठी पोलिसांनी दोन क्रेन बोलाविल्या असता दोन्ही क्रेन कुचकामी ठरल्या असल्याने मृतकास काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.