योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (३० डिसें.) – नागभीड तालुक्यातील मेंढा (की.) तसेच मांगरूळ या गावाची ग्राम पंचायत ची निवडणूक मध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.काल निवडणूक फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असल्याने मेंढा (की.) व मांगरुळ येथील भरलेल्या उमेदवारांपैकी कुणीही त्यांच्या विरुद्धात फॉर्म न भरल्याने त्यांची बिनविरोध निवळ झालेली आहे.मेंढा की. येथील ग्राम पंचायत चे नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व कृउबास नागभीड चे संचालक आनंद कोरे यांनी केलेला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करतांना चव्हाण तहसीलदार जि.प. सदस्य संजय गजपुरे व गोपालजी दडमल , तालुका कॅांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रमोद चौधरी व अन्य उपस्थित होते