अधिवेशनात सहभागी होण्याचे दत्ता गुरव यांचे आवाहन
गणेश इंगळे
ग्रामीण प्रतिनिधी अंबिकापुर
आंबिकापुर अकोला दि 1 जानेवारी सावित्री दिसे घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी ही घोषणा घेऊन महिला राजसत्ता आंदोलनाचे येत्या 3 जानेवारीला 1000 महिलां कारभारणींचे ऑनलाईन अधिवेशन फेसबुक, व झूम आयडी वरून 11 वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे ह्या राज्य अधिवेशनात मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावित्री अकादमीचे राज्य समनव्यक दत्ता गुरव यांनी केले आहे.
ऑनलाईन अधिवेशनाला उद्घाटन व मार्गदर्शक म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर, माजी राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया, कॉमन वेल्थ लोकल गव्हरमेन्ट फोरम आशिया खंडाच्या समनव्यक अनुसया कुवर,संविधान संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश सावंत, रिसोर्स सपोर्ट डेव्हलपमेंट संस्थापक भीम रासकर, महिला राजसत्ता आंदोलन राज्य निमंत्रक मालती सगणे ,उपस्थित राहणार आहेत.
ह्या ऑनलाईन अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रत्येक महिला लोकप्रतिनिधी ही पंचायत गाव कारभाराच्या दृष्टीने प्रशिक्षित कारभारणी व्हावी या विषयावर महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर बोलणार आहेत, तर लोकशाही बळकटीकरणं व्हायची असेल तर सर्वाचा सहभाग महत्वाचा आहे, याकरिता सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचे वारसदार होणे आवश्यक आहे, यावर माजी निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया मार्गदर्शन करतील,, महिलांचे राजकीय सक्षमीकरण तेही मूल्याच्या आधारावर याबद्दल महिला राजसत्ता आंदोलन बाबत अनुभव आशिया खंडाच्या समनव्यक अनुसया कुंवर मांडणार आहेत.
तर सावित्री दिसे घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी यावर संविधान संवर्धन समिती अध्यक्ष सुरेश सावंत, नितीन परांजपे,सरपंच शर्मिला रामटेके, नितीन देवतळे, मांडणी करतील,
पुढे सावित्रीबाईच्या लपलेल्या कवितांच्या वाचनाची काव्य मैफील होणार आहे, तसेच आंदोलनाचे 2021 मधील कार्यक्रम शासन पातळीवरील ठराव मांडणी होईल,
दरम्यान ह्या अधिवेशनात महाराष्ट्रातील संघटिका, प्रविण प्रशिक्षक,सरपंच,आणि पदाधिकारी असे 1000 प्रतिनिधी सहभागी होणार असून इतर महिला व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्यासाठी 3 जानेवारीला सकाळी 11 वाजता rscdindia या फेस बुक लाईवर , किंवा 82774205300 या झूम आय डी वर सहभागी व्हावे असे आवाहन सावित्री अकादमीचे राज्य समनव्यक दत्ता गुरव, राज्य निमंत्रक मालती संगणे यांनी केले आहे.