विलास केजरकर जिल्हा
प्रतिनिधी भंडारा.
भंडारा दि.३ जानेवारी
:- भंडारा जिल्हात अनेक सर्पमित्र असुन नेहमी फोन केल्यावर साप पकडण्याकरीता ते घरी हजर होतात. जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव भंडारा जिल्हा यांच्या लक्षात आले की, अनेक सर्पमित्र हे काठीने विषारी साप पकडतात. व ते आपले जिव धोक्यात घालुन साप पकडतात. त्याकरीता पोलीस अधिक्षक वसंत जाधव यांनी प्रथम उपक्रम म्हणुन स्नॅक सर्पमित्र योगेश राजकुमार पशीने भंडारा यांना बोलावुन नविन वर्षात पोलीस अधिक्षक कार्यालयात स्नॅक भेट दिली. त्यास पुढे धोका न पत्करता स्नॅकटॉग नी साप पकडण्याबाबद त्यास मागदर्शन केले. सदर कार्यक्रमात पोलीस अधिक्षक वसंत जाधव पोलीस उपअिधक्षक सुनिल डोंगरे व पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दिक्षित , पोलीस नायक अंकुश दिक्षीत हे उपस्थित होते.