विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.३ जानेवारी:- येथील न्यू फ्रेंड्स कॉलनी नंबर- ३ लक्ष्मी नगर जवळ खात रोड भंडारा येथील इंजिनियर शुभम गुरुदेव मेश्राम या गुणवंत विद्यार्थ्यांनी २०१८ मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेमध्ये प्रशंसनीय यश संपादन केले आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी-१ गट या गट-अ या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. शुभमने भंडारा येथील नगर परिषद बजाज प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे व लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे . त्यानंतर व्हीजेटी आय मुंबई येथून त्याने बी टेक पदवी परीक्षेत सुयश मिळविले. स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यास करण्याची त्याला आवड आहे. भविष्यात यूपीएससी परीक्षेत अंतर्गत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न व महत्वकांशी ध्येय आहे. गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर कुमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा जुगनाके, मोहाडी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम, भंडारा येथील उपकोषागार अधिकारी अभय निनावे, डॉ. गणेश मेश्राम, डॉ. शीला मेश्राम, आई वंदना मेश्राम, वडील गुरुदेव मेश्राम उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आई वंदना मेश्राम, वडील गुरुदेव मेश्राम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक आभार प्रदर्शन डॉ. संजय मानकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनुसया दहिवले, अंबादास खोब्रागडे, प्रतिमा खोब्रागडे, संजय दहिवले, दीपकचंद्र दहिवले, आरती दहिवले, शितल वासनिक, श्रद्धा मेश्राम , शामकला गिरेपुंजे, अँड. सुधीर मेश्राम, केसलवाडा येथील सरपंच हर्षविना मेश्राम, सशित वासनिक, सुधीर मेश्राम, प्रशांत बोरकर, गोपाल ढोरे, निलेश देशकर, दिनेश देशकर, कुलदीप कछवाह, समीर परसोडकर, सुधीर खंगार, आभा निनावे, जागेश्वर मेश्राम, कमलेश मेश्राम आदींनी सहकार्य केले.