नगर परिषदेचा उपक्रम
विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ४ जानेवारी:- भंडारा नगर परिषदच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गांधी चौक येथे हरित शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला
मुख्याधिकारी विनोद जाधव, उपमुख्याधिकारी
अश्विनी चव्हाण,
प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे,
अभियंता धनश्री वंजारी, अतुल पाटील,
लेखपाल इंग्लेश्वरी कन्सरे, राशिका लांजेवार, स्वास्थ्य अभियंता प्रशांत गणवीर, नगर रचना सहायक मुकेश कापसे, निखिल कांबडी, अनिकेत दुरगवडे उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांच्या कडुन हरित शपथ घेण्यात आली. मी दहा झाडे लावुन माझे कुटुंब, माझे जबाबदारी या अनुसंगाने झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे. मी स्वत: माझ्या कुटुंबियांना तसेच शेजारा-यांना नालीत तसेच कचरा कुंडीच्या बाहेर टाकण्यापासुन
रोखण्याचा प्रयत्न करीन तसेच वायु
प्रदूषण टाळण्यासाठी सदैव प्रयत्न करणे.
नागरिकांनी घरातील ओला व सूखा व घातक कचरा वेगवेगळा करुन नगर परिषदच्या घंटा गाडीत कचरा नित्य नियमाने टाकावे. अशी शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन प्रविण पडोळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
अशोक गोंन्नाडे, गणेश मुळे, महेश दुपारे, भागवत काळे, प्रविण वायाळ, स्वप्निल इंगोले, गणेश चव्हाण, राहुल देशमुख, बालाजी माने, पदमाकर भूरे, संग्राम कटकवार, मिथुन मेश्राम, अंकुश गजभिये, शकील मिर्झा, हेमचंद देशकर, किशोर उपरीकर, अशोक वैद्य, जगदीश राऊत, मिश्रा, रामभाऊ साखरकर, संजय निनावे, विनासत्य मेश्राम, वनिता बोटकुले यांनी सहकार्य केले.