विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ५ जानेवारी:- लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका लाखनी जिल्हा शाखा भंडारा तसेच नेफडो जिल्हा शाखा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासन निर्णयानुसार बालिका दिन, महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कलाशिक्षक दिनकर कालेजवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जे एम सी कन्स्ट्रक्शन कंपनीचे उपमुख्य अभियंता अजय प्रताप सिंग, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे , अभाअंनिसचे तालुका सचिव नामदेव कान्हेकर, ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिस व नेफडोचे पदाधिकारी प्रा. अशोक गायधने, गजानन गभने, अशोक वैद्य, दिलीप भैसारे पंकज भिवगडे, योगेश वंजारी होते.
प्रास्ताविकेतून प्रा. अशोक गायधने यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच महाराष्ट्र सरकारने महिला शिक्षण दिन घोषित करण्याबद्दल ग्रीनफ्रेंड्स तर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नामदेव कान्हेकर यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित स्वरचित काव्य सादर करून संबोधन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावरील विविध महत्वपुर्ण क्षणावर प्रकाश टाकला. यादरम्यान डॉ. मनोज आगलावे, अजय प्रताप सिंग यांचे हस्ते ग्रीनफ्रेंड्स तर्फे या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र बक्षीस देऊन गौरविण्यात आहे. कार्यक्रमाचे सुञ संचालन ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिस व नेफडोचे तालुका अध्यक्ष अशोक वैद्य व प्रास्ताविक दिलीप भैसारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आदित्य शहारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता छविल रामटेके, आशिष खेडकर, राहुल नान्हे, अर्णव गायधने, संकल्प वैद्य, रोशन बागडे, अयान रामटेके, वेदांत पंचबुद्धे, ओंकार चाचेरे, पंकज देशमुख, गौरेश निर्वाण, वज्रेश मेश्राम, भूषण धांडे, रोहित देशमुख, अमर रामटेके, दीप रामटेके, साहिल निर्वाण, प्रगती तरोणे तसेच ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिस व नेफडोच्या सदस्यांनी सहकार्य केले.