संदेश चौधरी
तालुका प्रतिनिधी महाड
महाड मधील किंजळघर (मठआळी) येथील दशनाम गोसावी समाज मंदिराचे भूमिपूजन समारंभ आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला, गिरी समाजाची मागणी आमदार भरत गोगावले यांनी पूर्ण केल्या बद्दल ग्रामपंचायत सदस्यासह काँग्रेस आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी केला आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, आमदार भरत गोगावले यांनी दिलेला शब्द पाळला, भूमिपूजन करुन सभागृहाच्या कामाला 5 लाख रूपये निधी मंजूर केला असुन. त्या निमित्त आम्ही सर्व समाजबांधव शिवसेनेत जाहीरप्रवेश करत आहोत असे प्रवेश कर्त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, रा जि प माजी सदस्य निलेश ताठरे, विभाग प्रमुख अनंत सावंत, युवसेना उपतालुका अधिकारी रोहिदास अंबावले, शाखाप्रमुख रतन शिंदे, संदिप खिडबिडे, रामदास अंबावले इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश गिरी, सुनिल गिरी, उदय गिरी वसंत गिरी, संतोष गिरी, गणेश गिरी, शशिकांत गिरी, दत्ताराम गिरी, गोपीनाथ गिरी, प्रविण गिरी, सनी गिरी सुरेश गिरी, रवी गिरी, विलास गिरी, सचिन गिरी, सुमित गिरी, साहिल गिरी, सुभाष गिरी, महेश गिरी या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, यांच्या या प्रवेशामुळे संपूर्ण मठ आळी शिवसेना मय झाली आहे, आमदार भरत गोगावले यांनी प्रवेश कर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करत आपण जनतेला दिलेला शब्द उशिरा का होईना पूर्ण करतो म्हणूनच ईतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, प्रवेश कर्त्यांना शिवसेनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आमदार गोगावले यांनी सांगितले.