प्रदीप घाडगे मुख्य संपादक
पवनी : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने पत्रकार बांधवांनी साजरा केला . कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार संघ असोशियनचे अध्यक्ष डॉ . भागवत आकरे होते . प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी , संपादक प्रेमचंद सूर्यवंशी उपस्थित होते . ज्येष्ठ पत्रकार ब्रह्मदास बागडे यांनी पत्रकार दिनाच्या संबंधाने विचार व्यक्त् केले . प्रेमचंद सूर्यवंशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.संपादक मनोहर मेश्राम यांनी पत्रकारांनी निर्भयपणे कार्य करावे , शासनाने पत्रकारांना आवश्यक त्या सोयी सवलती व संरक्षण त्यांना प्रदान करावे असे विचार व्यक्त केले . पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक पारधी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यावेळी दर्पण वर्तमानपत्र काढून समाजप्रबोधन करुन जनजागृती केली . संचालन प्रकाश पचारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी केले यावेळी एल.एन.काटेखाये , राजेश येलशेटीवार , प्रदीप घाडगे उपस्थित