विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ९ जानेवारी :- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक ९ जानेवारी २०२१ च्या पहाटे नवजात बालकांचा अतिदक्षता विभागातील कक्षात आग लागून दहा नवजात बालकांच्या मृत्यूबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या भंडारा जिल्हा कौन्सिलने शोक प्रकट करून या मृत बालकांच्या आई-बाबा बद्दल दुःखद संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मात्र ही दुर्घटना अत्यंत दुःखद असली तरी ह्या दुर्घटनेत मानवी लापरवाही आहे की, रुग्णालयात असलेल्या आवश्यक सोयी सोयीसुविधांचा अभाव, आवश्यक असलेली मनुष्यबळाची कमतरता कारणीभूत आहे. याची सखोल चौकशी करून दोषी असलेल्या व्यक्तींवर योग्य कारवाई करण्यात यावी आणि पीडित कुटुंबांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा जिल्हा कौन्सिलचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके तसेच जिल्हा सचिव मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यात कॉम्रेड शिवकुमार गणवीर, कॉम्रेड माधवराव बांते , काॅ. सदानंद इमले, कॉ. देविदास कानेकर, काॅ. राजू बडोलेे, काॅ. जयप्रकाश मसरके, काॅ. गजानन पाचे, काॅ. शांता बावनकर, काॅ. माणिकराव कुकडकर काॅ. भुपेश मेश्राम यांनी केली आहे.