संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.10 जानेवारी:-
जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे अतिदक्षता विभागात नवजात शिशु केअर युनिट झालेल्या दुर्घटनेत तालुक्यातील मोरगाव येथील सुषमा पंढरी भंडारी यांची एक दिवसाची मुलगी जुही हिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. सुषमा आठ जानेवारीला प्रसूती नंतर उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल झाली होती, काल दिनांक 9 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास अतिदक्षता विभागातील नवजात शिशु केअर युनिट ला आग लागली होती. या आगीत जुही हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृत्यू पावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे .अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांनी दि.9 जानेवारी ला सायंकाळी 6.00वाजता मृतक जुहीच्या आई सुषमा भंडारी व वडील पंढरी हरी भंडारी यांना 5 लाख रुपये चा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून देण्यात आला आहे.यावेळी तलाठी,मंडळ अधीकारी, तसेच भंडारा येथील महसूल अधिकारी उपस्थित होते.