विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.१२ जानेवारी:- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला रात्रीच्या वेळी आग लागून १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या नवजात चिमुकल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता भारतीय जनता पक्ष वरठी तर्फे आंबेडकर चौक वरठी येथे कँडल मार्च काढण्यात आले. आणि त्या नवजात चिमुकल्यांचा जीव जाण्यास दोषी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्या नवजात चिमुकल्यांना न्याय द्या अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी वरठी येथील भाजपा कार्यकर्ते मनोज सुखानी, चांगदेव रघुते, खुशाल सपाटे, रवी येळणे, रवी लांजेवार, संदीप बोंदरे, चंद्रकांत चौधरी, मिलिंद धारगावे, गणेश हिंगे, विरेंद्र देशमुख, एकनाथ बांगरे, नितीन भाजीपाले, श्यामा साठवणे, महेंद्र बालपांडे, धनपाल सार्वे, शालिक पंधरे, राष्ट्रपाल नारनवरे, अश्विन शेंडे, अनिल राऊत यांच्यासह इतर भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.