विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:- दि.१२जाने.२०२१ परंडा तालुक्यातील शेळगाव अंतर्गत भोसलेवस्ती शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा सरासरी १०महिने झाले बंदच आहेत, त्यामुळे मुले अभ्यासात मागे पडली आहेत की काय याची चाचपणी म्हणून मांसाहेब जिजाऊ यांचे जयंती निमित्त पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांचे वाचन व जोडाक्षर युक्त शब्दांचे लेखन याबाबत स्पर्धा घेण्यात आली.काही विद्यार्थी अभ्यासात मागे पडल्याचे दिसून आले,घरी दररोज वाचन व लेखन करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संभाजी मगर, महिला सदस्य वंदना मगर,शाळेला जागा दानपत्राने देणारे रामभाऊ गांगर्डे, मुख्याध्यापक वैजीनाथ सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.