योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
नागभीड (१२ जाने.)- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड येथील अनेक गावात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून यात महसूल, पोलीस, पंचायत समिती कर्मचारी कार्यरत असून निवडणूक पार पाडीत आहे. नागभिड तालुक्यात 43 ग्राम पंचायती निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केल्यानंतर 2 ग्राम पंचायती मध्ये निवडणूक अविरोध करण्यात आली होती मात्र 41 ग्राम पंचायती मध्ये निवडणूक होणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान पेट्या, निवडणूक चे साहित्य,13 निवडणूक अधिकारी व त्या करिता लागणारा कर्मचारी उपस्थित राहून उमेदवार, रिंगणात उतरले आहेत असे सदस्य यांनी मत पेट्या चिन्हे मशीन याची खात्री करून घेतली. या बाबी महत्त्वाच्या आहेत असे तालुका निवडणूक अधिकारी/तहसीलदार चव्हाण साहेब यांनी प्रशासन सज्ज झाले आहेत असे सांगितले.