विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १४ जानेवारी
:- भंडारा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून ३५ मतदान केंद्रावर आज दि. १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे.
भंडारा तालुक्यातील ३५ ग्राम पंचायतीच्या निवडणूकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यात भंडारा तालुक्यातील ३५ ग्राम पंचायतीच्या १११ प्रभागातून ३०५ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्याकरिता ६८५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्याकरिता भंडारा तालुक्यातील पुरुष- २८ हजार २९४ तर महिला- २७ हजार ५७० असे एकूण ५४ हजार ७५७ मतदार, मतदानाचा हक्क बजावणार आहे.
ग्राम पंचायत निवडणूकीसाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस व कर्मचारी हे निवडणूक कार्यात मग्न आहेत. आज सकाळी ७.३० वाजेपासुन मतदान सुरू झाले असुन सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. तसेच दिव्यांग मतदाराकरिता ये-जा करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील नागरिकांनी वेळेचे भान ठेऊन शंभर टक्के मतदान करावे असे मत तहसिलदार अक्षय पोय्याम यांनी व्यक्त केले आहे.