किरण कुमार निमकंडे
तालुका प्रतिनिधी
पातूर तहसील अंतर्गत येत असलेल्या एकूण 23 ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये 221 जागांनसाठी 474 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज नामांकित केले असून आज 15 तारखेला मतदान केंद्रावर पातुर तहसील व पोलिस प्रशासनाच्या कडक बंदोंबस्ता मध्ये नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदान केले तर संपूर्ण पातूर तालुक्यामध्ये एकूण. 49121 मतदानापैकी 37464. मतदारांनी मतदान बजावले तालुक्यात एकूण 76.27% मतदान झाले. ही निवडणूक पातुर तहसीलदार निवडणूक अधिकारीदिपक बाजड यांच्या देखरेखी खाली झाली असून यामध्ये पातुर नायब तहसीलदार सय्यद ऐसानोद्दीन, निवडणूक निर्णय अधिकारी कार्य बजावले , नायब तहसीलदार विजय खेडकर ,व उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी, पोलीस उपनिरीक्षक गजानन सिंह ठाकुर, अमोल गोरे, गणेश नाव कार,तर चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये चांन्नी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल वाघ यांनी तगडा बंदोबस्त ठेवला